पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पृथ्वीला पुन्हा दुखापतीचं 'ग्रहण'

पृथ्वी शॉ

न्यूझीलंडविरुद्धच्या खडतर दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. बॅकअप सलामीवीर म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत जाणारा पृथ्वी शॉने न्यूझीलंड अ संघासोबत होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. रणजी स्पर्धेमध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतलाय.  

Cricket Record :यंदा विक्रमादित्याचे हे तीन विक्रम रनमशीनच्या रडारवर

२४ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड अ विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून माघार घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय संघातील त्याचे पुनरागमन आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या सहभागाबद्दल तुर्तास कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतावेळी पृथ्वी शॉच्या खांद्याला दुखापत झाली होती.  तो सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निरिक्षणाखाली आहे. त्याच्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 

 

IndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्याने पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकी कामगिरी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर दौरा अर्ध्यावर सोडून  माघारी मायदेशी परतण्याची वेळ आली होती.