पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ranji Trophy : पृथ्वीच्या जोरावर मुंबईकरांनी बडोद्याच मैदान मारलं

पृथ्वी शॉ

युवा सलामीवीर पृथ्वी शॉचे धमाकेदार द्विशतक आणि फिरकीपटुंच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या संघाने रणजी चषकाच्या सलामीच्या लढतीत बडोदाच्या संघाला ३०९ धावांनी पराभूत केले. रणजी चषकात 'ब' गटात असलेल्या मुंबईने बडोदाच्या संघासमोर ५३४ धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या आणि अखेरच्या दिवशी बडोदा संघाने ३ बाद ७४ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा संघ २२४ धावांतच आटोपला.  

 

पृथ्वीचा डबल धमाका, प्रथम श्रेणीतील पहिले द्विशतक

दीपक हुड्डा (६१) आणि अभिमन्युसिंह राजपूत (५३) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फंलदाजाला मुंबईकर गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही.  मुंबईकडून डावखुरा फिरकीपटू  शम्स मुलानीने ७२ धावा खर्च करत चार गड्यांना तंबूत धाडले. फिरकीपटू शशांक अत्रादे आणि मध्यम जलदगती गोलंदाज आकाश पारकर प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. 

सचिन विराट नव्हे दीपिकाला आवडतो हा क्रिकेटर

उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर निलंबनाची शिक्षा भोगलेल्या पृथ्वीनं सलामीच्या सामन्यात २०२ धावांची खेळी केली. तर कर्णधार सूर्यकुमारने १०२ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या डावात ४३१ धावा केल्यानंतर बडोद्याचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला होता. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात ४ बाद ४०९ धावांवर डाव घोषीत करत बडोद्यासमोर मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बडोदा संघ  २२४ धावांत आटोपला.