पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट सेनेच्या 'दादागिरी'तील कमजोरीकडे बोट

सौरव गांगुली आणि विराट कोहली

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली याने विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या 'कमजोरी'वर अधिक भर देणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या घडीला विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेटच्या मैदानात दादागिरी (हा शब्द सातत्याने प्रतिस्पर्धावर भारी पडण्याच्या उद्देशाने वापरला आहे) करताना दिसत असला तरी मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला हारारकीचा सामना करावा लागला आहे. 

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावर मितालीचा शाब्दिक मारा

इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून मिळालेला पराभव असो किंवा यंदाच्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून मिळालेला धक्कादायक पराभव असो...मोठ्या सामन्यात अखेरच्या टप्यात भारतीय संघाचा निराशजनक शेवट झाल्याचे पाहायला मिळाले. याच मुद्यावर अधिक भर द्यावा लागणार असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. गांगुली पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की, भारतीय संघाने मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. पण सेमीफायनल आणि फायनलमध्ये भारतीय संघ बारगळल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीमध्ये संघाची ही सवय बदलण्याची क्षमता आहे, असेही गांगुलीने सांगितले. 

सचिन, लाराची फटकेबाजी पुन्हा पाहायला मिळणार

भारतीय संघ २०१३ च्या चॅम्पियन चषक स्पर्धेनंतर आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकू शकलेला नाही.  २०१७ च्या चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघ सेमीफायनलमध्ये गडबडला होता.
गांगुली पुढे म्हणाला की, भारतीय संघाने आयसीसीच्या आगामी स्पर्धेत ही उणीव भरुन काढण्याच्या दृष्टिने लक्षकेंद्रीत करायला हवे. कोहलीने यावर गंभीर विचार करायला हवा. संघाला आवश्यक ती मदत करण्यासाठी बीसीसीआय सकारात्मकता दाखवेल, असेही गांगुलीने यावेळी म्हटले आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prince of kolkata Sourav Ganguly wants Virat Kohli to focus on winning big tournaments of icc