पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदी म्हणतात, वर्ल्ड कपमध्ये धवनची उणीव भासेल!

शिखर धवन

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील तीन सामन्यानंतर हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन स्पर्धेबाहेर पडला आहे. धवनने दुखापतीतून सावरुन लवकर मैदानात यावे, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश झाला आहे. धवनने दुखापतीतून सावरुन लवकर मैदानात यावे, अशी भावना मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.  

मोदींनी धवनसंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये लिहलंय की, "वर्ल्ड कपच्या मैदानात संघाला तुझी उणीव भासेल यात कोणतीच शंका नाही. परंतु मी आशा करतो की, तू लवकरच पुन्हा संघात कमबॅक करुन देशासाठी महत्त्वपूर्ण योगदाना देशील."  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जूलैपर्यंत तो दुखापतीतून सावरणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बीसीसीआयने धवन उर्वरिरत स्पर्धेत संघासोबत राहणार नाही, हे स्पष्ट केले होते. त्याच्या बॅकअपसाठी आलेल्या ऋषभ पंतची संघात वर्णी लागली होती. 

धवनशिवायही भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो: मायकल हसी

उल्लेखनीय आहे की, ज्या सामन्यात धवनला दुखापत झाली, त्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले होते. धवन-रोहित ही जोडी सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील अव्वल सलामीची जोडी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्याची उणीव संघाला नक्कीच भासणार आहे. 

 

ICC WC 2019 : बीसीसीआयचा रिव्ह्यू फेल! धवन 'आउट' पंत 'इन'