पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या ४० खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू, धावपटू हिमा दास यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी चर्चेत सहभाग घेतला होता. कोरोनाविरोधातील सामना जिंकण्यासाठी मोदींनी दिग्गज खेळाडूंना पाच सूत्री मंत्र दिलाय.
कोविड-१९ : रिपोर्ट निगेटिव्ह! खेळाडू पुढील काही दिवस लॉकडाऊन राहणार
संकल्प, संयम, सकारात्मकता, सन्मान आणि सहकार्य याच्या माध्यमातून कोरोनावर मात करायची आहे, असे मोदींनी खेळाडूंना सांगितले. मोदी पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे तुम्ही देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली त्याप्रमाणे आता तुम्हाला देशवासियांमध्ये मनोबल वाढवण्याचे काम करायचे आहे. खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असलेल्या फिटनेस व्हिडिओसह, त्यांच्याकडून (खेळाडू) गरजूंना केली जाणारी मदत ही कौतुकास्पद असल्याचा उल्लेखही मोदींनी यावेळी केला. पीएम केअर्स फंडाला हातभार लावणाऱ्या खेळाडूंचेही मोदींनी यावेळी आभार मानले. देशातील खेळाडू कोरोनाला हद्दपार करण्याच्या लढ्यात उत्कृष्ट कार्य करत आहेत, असे मोदींनी म्हटले आहे.
'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'
देशात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची देशातील संख्येने दोन हजारी पार केली असून पन्नासहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा द्यायचा आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी तिसऱ्यांदा देशवासियांना संदेश दिला. आंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी संकटाचा धैर्याने सामना करायचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.