पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिंधूची ऐतिहासिक कामगिरी युवा खेळांडूसाठी प्रेरणादायी : PM मोदी

पी.व्ही. सिंधू

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्यासह काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सिंधूचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, प्रतिभावंत पी.व्ही. सिंधूने आणखी एकदा देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! सिंधूची कामगिरी प्रेरणादायी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. 

 BWF WC 2019: अखेर सिंधूने सुवर्ण कामगिरी करुन दाखवली

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सिंधूला शुभेच्छा दिल्या. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी सिंधू पहिली भारतीय आहे. तिची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी देशातील खेळाडूंना चांगली सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सिंधूचे कौतुक केले. सिंधूची कामगिरी देशाची मान अभिमानाने उंचावणारी आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Prime Minister Narendra Modi and Sports Minister Kiren Rijiju congratulate PV Sindhu for winning gold medal in BWF World Badminton Championship