पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईच्या या गड्याला खरेदी करुन केकेआरने रचला अनोखा विक्रम

प्रविण तांबे कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात

आगामी आयपीएलसाठीच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये २० लाख रुपये बेस प्राइजमध्ये मुंबईकर प्रवीण तांबेला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ताफ्यात घेतले. सर्वात महागडा खेळाडू खरेदी करण्याच्या विक्रमानंतर आयपीएलमधील सर्वात वयोवृद्ध खेळाडू त्यांनी आपल्या संघात घेत एक अनोखा विक्रम कोलकाताने आपल्या नावे केला.  

Video : विक्रमी बोलीनंतर पॅट कमिन्सनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

२०१८ मध्ये अनसोल्ड राहिलेला प्रवीण तांबे आगामी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पाहायला मिळाले होते. २०१३ या आयपीएल हंगामात प्रवीण तांबेने राजस्थान रॉयल्सकडून  पदार्पण केले होते. दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमधील सर्वात वयोवृद्ध खेळाडूचा विक्रम आपल्या नावे केला होता. २०१६ च्या हंगामात तो गुजरात लायन्सच्या संघातूनही काही सामने खेळताना दिसला होता. 

ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या रिंगमध्ये इतिहास घडेल, अमित पंघलला विश्वास

२०१४ च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना प्रवीण तांबेने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक नोदंवली होती. ५ मे २०१४ मध्ये अहमदाबादच्या मैदानातील कामगिरीवेळी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. एवढेच नाही तर या हंगामात  सर्वाधिक विकेट घेत तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pravin tambe 48 sold to kkr at ipl 2020 player auction mumbai cricketer becomes the oldest player to KKR picked at the auctions