पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAB : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण

दिल्लीत पुन्हा तणावाचे वातावरण

जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलीस यांच्यातील तणावानंतर देशभरात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संतप्त सूर उमटताना दिसत आहे. जामिया विद्यापीठानंतर दिल्लीतील सीलमपूर आणि जफराबाद परिसरात हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.  

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील

यादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धुमचक्री झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पुन्हा एकदा पोलीस बळाचा वापर झाला. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचेही वृत्त येत आहे. 

'जामिया'मध्ये जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच: मुख्यमंत्री

या परिसरात मोठ्या प्रमाणात फौजाफाटा तैनात करण्यात आला असून आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणाऱ्या तरुणींची संख्या पाहता महिला पोलिसांना देखील याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी दिल्ली पोलीस ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करत आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Police take away protesters from the spot where a clash broke out between police and protesters during protest against Citizenship Amendment Act