पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊननंतर आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली

यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा होणे असंभव झाले आहे (संग्रहित छायाचित्र)

यंदाच्या १३ हंगामातील आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार का? याच उत्तर देणं आता भारतीय क्रिकेट मंडळालाही अवघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आणखी वाढली आहे. मोदींनी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. 

शेअर बाजारात सकारात्मक वातावरण, निर्देशांकात वधारणा

दुसरीकडे जगातील मानाची स्पर्धा असणारी ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने घेतला आहे. या परिस्थितीत बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा घेण्याचा विचार आता सोडून द्यायला लागेल. यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नसले तरी त्यांच्यासमोर स्पर्धा रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय सध्यातरी दिसत नाही. 

सद्यपरिस्थितीला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाचशेपेक्षा अधिक झाला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देशातील परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले असून स्पर्धेसंदर्भात काय बोलावे सूचत नाही,अशी प्रतिक्रिया गांगुली यांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी स्पर्धा नियोजित वेळेत घेण्यावर ठाम असलेल्या गांगुली यांचे मौन स्पर्धा रद्द होण्याचे संकेत देणारे आहेत. 

कॅबिनेट बैठकीत दिसली 'सोशल डिस्टन्सिंग'ची झलक, पाहा व्हिडिओ

आयपीएल स्पर्धेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गांगुली म्हणाले की, सध्याच्या घडीला मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. आम्ही अद्याप स्पर्धेला स्थगिती दिली त्या निर्णावरच आहोत. पण दहा दिवसांमध्ये परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. त्यामुळे स्पर्धेविषय नक्की काय बोलावे हेच आता सूचत नाही. कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मात्र लॉकडाऊनच्या घोषनेनंतर यंदाची स्पर्धा होईल, असे वाटत नाही.