पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जोफ्राचे ट्विट व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर जोफ्राचे जूने ट्विट व्हायरल

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या भविष्यवाणीची चर्चा आपण इंग्लंडध्ये रंगलेल्या विश्वचषकावेळी ऐकली होती. विश्वचषकातील सामना बरोबरीत सुटण्यापासून काही सामन्याचा अंदाज त्याने ट्विटच्या माध्यमातून अगोदरच व्यक्त केल्याची चर्चाही रंगली. आता कोरोना विषाणूच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जोफ्राचे एक ट्विट चर्चेत आले आहे. २०१७ मध्ये जोफ्राने तीन आठवडे घरात राहणे पुरेसे नाही. अशा आशयाचे प्रश्नार्थक ट्विट केले होते. 

कोरोनाविरोधातील सामना जिंकायचा असेल तर तीन आठवडे घरातून बाहेर पडायचे नाही, असे मोदींनी सांगितले आहे. कोरोना विषाणूने प्रगत राष्ट्रांनाही हतबल केले असून या विषाणूला हतबल करुन देशवासियांच्या आणि देशाच्या भल्यासाठी संपूर्ण देशात सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा मोदींनी केली आहे. तीन आठवड्यांच्या काळात कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. याकडे कर्फ्यूसारखेच पहा, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. 

रोजंदारीवर पोट असलेल्यांना मदतीचा हात द्या!-सानिया

अगदी याच आशयाचे जोफ्राचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विश्वचषक स्पर्धेत सुपर ओव्हर आणि बेन स्टोक्सची खेळी याविषयी त्याने केलेले ट्विट चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर जोफ्राचे ट्विट चर्चेत आले आहे. २० ऑगस्ट  २०१४ मध्ये त्याने केलेले ट्विट आणखी भयावह आहे. एक वेळ अशी येईल की आपल्याल कुठे जावे हे कळणार नाही, असे ट्विट त्याने केले होते. कोरोनाचा कहर त्याच्या या ट्विटला पुष्टी देणारा असाच आहे. जोफ्राच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

घरी बसून कपडे, टॉयलेट धुतोय शिखर धवन, शेअर केला मजेशीर Video

---------------

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर मैदानातील अचूक माऱ्यासह ट्विटच्या अचूक अंदाजाने नेहमीच चर्चेत असतो. आर्चरच्या ट्विटनुसार कोरोनाविरोधच्या लढ्यात तीन आठवड्यापेक्षाही अधिक काळ आपल्याला घरात बसावे लागेल, असेच संकेत मिळतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi announced 21 days lockdown in india due to corona virus jofra archer 2 years old tweet is going viral