पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : IPL स्पर्धेला स्थगिती द्या, कोर्टात याचिका दाखल

आयपीएल स्पर्धेवर कोरोनाचे सावट

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २९ मार्चपासून मुंबईच्या वानखेडेच्या मैदानातून आयपीएल स्पर्धेचा शुभारंभ होणार असल्याचे नियोजित आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल स्पर्धा नियोजित वेळेत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएल स्पर्धेसंदर्भात संभ्रम कायम असताना एका वकिलाने कोर्टात याचिका दाखल करत स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे.  

कोरानामुळे IPL ची तिकीट विक्री करु नये, राज्य सरकारची भूमिका?

वकील एलेक्स बेंजिगर यांनी आयपीएल स्पर्धा रद्द करावी, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे. कोरोना व्हायरसवर सध्याच्या घडीला कोणतेही औषध उपलब्ध नाही, असे  जागतिक आरोग्य संघटने सांगितले असून या रोगाची तीव्रता  लक्षात घेत स्पर्धेला स्थगिती द्यावी, असा उल्लेख एलेक्स बेंजिगर यांनी आपल्या याचिकेत केला आहे. यासंदर्भात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर गुरुवारी ते आपली बाजू मांडणार आहेत. न्यायालय यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  
 
कोरोना बाधितांची ओळख उघड करु नका, प्रशासनाची पुन्हा विनंती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात स्पर्धांना स्थगिती

चीनच्या वुव्हानमधून कोरोना व्हायरसने आता जगभरात कहर माजवला आहे. चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. इटलीत १० हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५०० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इटलीतील सर्वात लोकप्रिय फुटबॉल लीग 'सेरी ए' तील काही सामने प्रक्षकांशिवाय खेळवण्यात आले. त्यानंतर या लीगसह अन्य स्पर्धेला इटलीमध्ये स्थगिती देण्यात आली आहे.   

INDvsSA : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी 'प्रोटोकॉल'

स्पेन आणि इंग्लंडमध्ये देखील कोरोनाने कहर माजवला असून स्पेनमधील लोकप्रिय ला लीगा या फुटबॉल स्पर्धेतील सामने हे प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. इंग्लिश प्रीमियर लीग मधील मँचेस्टर सिटी आणि अर्सनल यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशातील स्पर्धा रद्द करण्यात आल्या असताना भारतामध्ये लागोपाठ स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळते. आयपीएल पूर्वी रोड स्पठी सीरीजच्या रुपात निवृत्त क्रिकेटर्स मैदानात उतरत आहेत तर १२ मार्चपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.