देशातील खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य देशासाठी प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणारे आहे. अल्मोर येथील हिदुस्थान वृत्तपत्राच्या युवा संम्मेलनामध्ये त्यांनी खेळ आणि खेळासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
IND vs BAN : गब्बर-हिटमॅन जोडी मैदानात उतरताच 'शतक' ठोकणार
ते म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये आपण खूप मागे आहोत. या स्पर्धेत दबदबा निर्माण करण्यासंदर्भात आपल्याकडून प्रयत्न सुरु आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्याला केवळ दोन पदकं मिळाली होती. आगामी स्पर्धेत हा आकडा वाढवण्यासाठी खेळाडू अतोनात मेहनत घेत आहेत. त्यामुळे यंदाच्या सर्धेत हा आकडा वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोहलीसोबत खेळलेल्या क्रिकेटर्संना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक
२०२८ पर्यंत भारतीय खेळात अव्वल दहामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहित केले जात आहे. खेळाच्या दर्जामध्ये सुधारणा आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खेळाडूंच्या पाठिशी उभे राहण्यासाठीच मी क्रीडा मंत्री झालोय, असेही त्यावेळी म्हणाले.