पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL 7 : बंगाल वॉरियर्सने फायनल युद्ध जिंकले!

बंगाल वॉरियर्सने पहिल्यांदा उंचावले जेतेपद

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातील अंतिम सामन्यात बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीच्या संघाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले. आतापर्यंतच्या प्रो कबड्डीच्या हंगामातील त्यांचे हे पहिले विजेतेपद आहे. अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीला ३९-३४ असे पराभूत करत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.  

गांगुलीनं मनावर घेतलं तर पुजारा-रहाणेचं वेतन वाढेल

उल्लेखनिय आहे की, २०१४ मध्ये प्रो कबड्डी लीगच्या हंगामातील पहिला विजेता होण्याचा मान हा जयपूर पिंक पँथर्सने मिळवला होता. यापूर्वी जेतेपद पदावर केवळ चार संघाची मक्तेदारी होती. २०१५ मध्ये यू मुम्बाने तर त्यानंतर पाटणा पायरेट्सने सलग तीनवेळा प्रो कबड्डी लीगचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. गत वर्षी बंगळुरु बुल्सने गुजरातला नमवत बाजी मारली होती.

ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय हॉकी संघ सज्ज  

मात्र यंदाच्या हंगामात हे चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले.  बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली या संघांनी फायनलमध्ये धडक मारल्यानंतर प्रो कबड्डीच्या मैदानात 'नवा गडी नवं राज्य' पाहायला मिळणार हे पक्के होते. मात्र या जेतपदावर अखेर कोण कब्जा करणार याकडे तमाम कबड्डी चाहत्यांचे लक्ष लागून होते. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pkl 2019 bengal warriors beat dabang delhi 39 34 to win maiden pro kabaddi league title