पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PKL : दिल्ली समोर पाटणा हारले, पण..चर्चा फक्त नारवालचीच!

प्रदीप नारवालची विक्रमी कामगिरी

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात गुणतालिकेतून पहिल्यांदा दुसऱ्या स्थानावर घसरलेल्या दबंग दिल्लीने पाटणा पायरेट्सला ४३-३९ अशा फरकाने पराभूत करत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले. या सामन्यात नवीन एक्स्प्रेसने आणखी सुपर १० चा धमाका करत हंगामातील सलग १६ वेळा असा पराक्रम करुन एक नवा विक्रम आपल्या नावे केला. यंदाच्या हंगामातील त्याची ही सुपर १० ची १७ वी वेळ आहे. सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला चढाईत ५ गुण मिळवत विजयने सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. 

PKL पुणेरी फलटणची 'हाररकी', बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीला टाकले मागे

दुसरीकडे  प्रदीप नारवालने आपल्या संघाच्या खात्यात एकूण १८ गुणांचे योगदान दिले.  प्रोकबड्डीच्या इतिहासात त्याने चढाई करताना १ हजार १०० गड्यांना बाद करण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला. प्रो कबड्डीच्या इतिहासात असा पराक्रम प्रदीप नारवालशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला हजार गडी बाद करण्याचा पराक्रम करता आलेला नाही. यंदाच्या हंगामातील १३ वा आणि सातत्याने ९ वेळा सुपर १० ची कामगिरी करत नारवालने स्वत:चा सातत्याने ८ सुपर १० ची कामगिरी करण्याचा विक्रम मोडित काढला. पण त्याला पाटणा पायरट्स संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. 

..म्हणून धोनी क्रिकेटपासून दूर, लवकरच कमबॅक करणार

पहिल्या सत्रात दोन्ही संघानी सावध खेळाला सुरुवात केली. पाटणा नेहमीप्रमाणे नारवालवर तर दिल्लीचा संघ नवीन एक्स्प्रेसवर अवलंबून दिसला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी १३-१३ अशी बरोबरी केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रदीप नारवालचा धमाका पाहायला मिळाला. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर पाटणाने दिल्लीला दोनवेळा ऑल आउट केले. अखेरच्या ६ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना पाटणाचा संघ ६ गुणांनी आघाडीवर होता. पण ३८ व्या मिनिटाला विजयने सुपर चढाई करत ५ गडी बाद करुन सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर दिल्लीने सामन्यावर पकड मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केला.