कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानात गुलाबी रंगाच्या चेंडूवर खेळवण्यात येणाऱ्या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. भारत-बांगलादेशच्या संघासाठी हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याच्या उत्सुकतेची तुलना कोहलीने थेट पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याशी केलीय. ईडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यापूर्वी विश्वचषकात ईडन गार्डनवर रंगलेल्या सामन्याबद्दल अशी चर्चा आणि उत्सुकता अनुभवली होती, असे विराट कोहलीने म्हटले आहे.
Pink Ball Test : ईडन गार्डनवर वाहतेय गुलाबी हवा...
भारत-बांगलादेश यांच्यात रंगणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची चार दिवसांची तिकीटे विकली गेली आहेत. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने संघासह आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. कोहली म्हणाला की, 'गुलाबी चेंडूवर खेळणे कठीण असेल. गोलंदाजी कशी होतेय. फलंदाज चेंडूचा सामना कसा करतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. गुलाबी चेंडूवर खेळण्याची सवय झाल्यानंतर हळूहळू हा खेळ सोपा होईल, असेही विराट यावेळी म्हणाला.
आतापर्यंत झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांवर एक नजर..
विश्वचषकानंतर भारताने विंडीज दौऱ्यापासून ते नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विजयी गाथा कायम ठेवली होती. बांगलादेश विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशीच सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऐतिहासिक कसोटी सामना जिंकून पाहुण्यांना पराभूत करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.