जर भारतीय संघ यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला नाही. तर पाकिस्तानही २०२१ मध्ये विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी शनिवारी म्हटले. ते लाहोर येथे पत्रकारांशी बोलत होते.
टी-२० वर्ल्डकपमध्ये कोण करणार विकेटकीपिंग, सौरव गांगुलीने दिले उत्तर
यावेळी त्यांनी बांगलादेशाला पाकिस्तान दौऱ्यावर येण्याच्या बदल्यात आशिया चषकाचे यजमानपद देण्याचा शब्द दिल्याचे वृत्त फेटाळले. ते म्हणाले, आशियाई क्रिकेट परिषदेने आयोजनाचे अधिकार आमच्याकडे सोपवले आहेत आणि आम्ही कोणालाही ते देऊ शकत नाही. आमच्याकडे तो अधिकार नाही.
मसल पॉवर रसेल झाला 'बाप'माणूस
भारताबरोबरील तणावामुळे पाकिस्तान आशिया चषकाच्या यजमानपदासाठी दोन ठिकाणांचा विचार करत असल्याचेही त्यांनी मान्य केले. भारताने २००८ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. राजकीय आणि कूटनीतीक संबंधांमुळे २००७ पासून पाकिस्तानबरोबर पूर्ण द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी २०१२ मध्ये भारताचा दौरा केला होता.