आयपीएलप्रमाणे पाकिस्तानमध्ये रंगणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेच्या प्रेक्षपणाचे अधिकार चक्क सट्टेबाज कंपनीने खरेदी केले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी याची कबुल दिली आहे. जागतिक मीडिया भागीदार असलेल्या ब्रिटनमधील आयटीडब्ल्यू या कंपनीने पीएसएल सामन्यांच्या 'स्ट्रीमिंग'चे अधिकार 'बेट365' कंपनीला विकले होते.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १ कोटींचे मास्क जप्त
हे प्रकरण समोर आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने आयटीडब्लूशी चर्चा केली. यावेळी पाक बोर्डाला माजी क्रिकेटर्स आणि समीक्षकांच्या टीकेचा सामना करावा लागला. 'बेट365' ने स्पर्धीतील प्रत्येक सामन्यादरम्यान सट्टेबाजीचा प्रकार केला होता. पीसीबीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, प्रसारमाध्यमातील वृत्तानंतर हा प्रकार बोर्डाच्या लक्षात आला. पाक क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापनावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लॉकडाऊननंतर आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली
सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना देखील पाक बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट लीग स्पर्धा सुरु ठेवून बोर्डाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. जगभरातील स्पर्धा रद्द होत असताना पाकधील स्पर्धा सुरुच होती. जसजसे कोरोनाचा प्रादुर्भाव भीषण होत गेला तस तसे परदेशी खेळाडूंनी स्पर्धा सोडून मायदेशी जाण्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले होते.