पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा

नऊ बोट असताना क्रिकेट खेळण खूप कठिण होत, असेही पार्थिव पटेलने म्हटले आहे.

यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलने अवघ्या वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले होते. माजी कर्णधार महेंद्रधोनी वाढत्या प्रभावात गडप झालेला  यष्टिरक्षकापैकी एक असलेला ३५ वर्षीय पार्थिव पटेल इंडियन प्रिमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून तर रणजीमध्ये तो आजही गुजरातचे प्रतिनिधत्व करताना दिसतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळ-स्पर्धेला विराम लागला असून या मुश्किल समयी मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्ये क्रिकेटर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते. नुकतेच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना पार्थिवने नऊ बोटाच्या सहाय्याने खेळणे किती कठिण होते, या गोष्टीला उजाळा दिला.  

सचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज

इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये पार्थिव म्हणाला की, सहाव्या वर्षी एका हाताचे बोट दरवाजामध्ये सापडले होते. उपचारादरम्यान बोट कट करावे लागले. त्यानंतर क्रिकेट खेळणे माझ्यासाठी खूपच कठिण झाले होते. पण जिद्दीमुळे नऊ बोटांच्या जोरावर पार्थिवने भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करुन दाखवले.  तो पुढे म्हणाले की, विकेट किपिंग करत असताना मी ग्लोव्हजचे खाली राहणारे करंगळीचा भाग टेपने चिटकवून खेळायचो. त्यामुळे मला खूप मोठी मदत व्हायची. दहा बोटे असती तर माझी कामगिरी कशी झाली असती माहित नाही पण नऊ बोटांसह भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे अभिमानास्पद होते, असेही पार्थिवने यावेळी सांगितले.  २००२ मध्ये पार्थिव पटेलने आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतही तो भारतीय संघासोबत होतो. त्याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'

 २००३-०४  मध्ये सिडनीच्या मैदानात खेळत असताना स्टीव्ह वॉ फलंदाजी करत असताना पार्थिव पटेलने त्याच्याविरोधात स्लेजिंग केले होते. यावेळी स्टीव्ह वॉने त्याला दुसऱ्याचा सन्मान करायला शिक, असा सल्ला दिला होता. तू जेव्हा डायपर वापरायचास तेव्हा मी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलोय असेही वॉने पार्थिवला म्हटले होते. त्याचे हेच शब्द पार्थिवने २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्टीव्हा वॉच्या मुलाला सुनावले होते.  पार्थिव पटेलने ऑस्टिन वॉला म्हटले होते की, ''जेव्हा तू डायपर वापरायचास तेव्हा मी पहिला कसोटी सामना खेळला आहे. या शब्दातून मी वॉची परतफेड केली असेही पार्थिवने सांगितले. तुझ्या वडिलांना (स्टिव वॉ) मी त्यांचा सन्मान करतो म्हणून सांग, असा टोलाही लगावल्याचा किस्साही पार्थिवने यावेळी शेअर केला.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Parthiv Patel recalls incident when he lost one of his finger says donot know how it would have been if I had all fingers also Share steve waugh son sledges