पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजारातही जोकोविचनं प्रतिस्पर्ध्याला केलं बेजार

नोव्हाक जोकोविच

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आजारी असतानाही कोर्टवर उतरुन सामना जिंकण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने फ्रान्सच्या  कोरेनटिन मातेतला ७-६ (७-२), ६-४ असे पराभूत केले. या विजयासह त्याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला असून त्याच्यासमोर आज (गुरुवारी) ब्रिटनच्या कायले एडमंडचे आव्हान असणार आहे.   

दीर्घकालीन रजेमुळे द्रविड दुहेरी लाभाच्या आरोपातून निर्दोष ठरणार?

बुधवारी झालेल्या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की, गळ्याच्या समस्येमुळे हैराण असून यातून मी पूर्णपणे बरा झालेलो नाही. त्यामुळे कोर्टवर खेळताना तुमच्या हालचाली म्हणाव्या तशा होत नाहीत. परंतु सद्य परिस्थिती स्विकारुन तुम्हाला शक्य ते प्रयत्न करावे लागते. सामना जिंकून त्याने ते करुनही दाखवले. हाच जोश तो उपांत्यपूर्व फेरीत दाखवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.  

IND vs BAN : दिल्लीतील सामन्यावर गांगुलींकडूनही मोहोर!

दुसऱ्या लढतीमध्ये राफेल नदालने  एड्रियन मनारिनोला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्याने मनारिनोला याला ७-५, ६-४ असे पराभूत केले. या स्पर्धेत नदालसमोर आता तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या स्टेन वावरिंका याचे आव्हान असणार आहे.