पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून अनिल कुंबळेंनी मानले PM मोदींचे आभार

अनिल कुंबळे

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवणाऱ्या अनिल कुंबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात अनिळ कुंबळेंच्या प्रेरणादायी खेळीचा दाखला दिला होता. 
सोमावरी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातील ऐतिहासिक भागीदारी आणि हनुवटीला दुखापत झाल्यानंतरही मैदान न सोडता मल्लमपट्टी करुन भारतीय संघासाठी खेळून कुंबळेंनी प्रेरणादायी उदाहरण आपल्यासमोर ठेवले असल्याचे मोदींनी म्हटले होते.  

आदित्य ठाकरेंकडून जाता जाता पुणेकरांना 'आफ्टरनून लाईफ'चा टोला!

२००१ मध्ये भारत-आस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याचा दाखला देताना मोदी म्हणाले होते की, आपल्या संघाला एकामागून एक धक्के बसत होते. संघाची अवस्था बिकट अशी होती. या परिस्थितीत राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने केलेली भागीदारी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी होती. २००२ मध्ये अँटिगा कसोटीत अनिल कुंबळे यांनी दुखापतीनंतर सामना खेळला होता.

तान्हाजी करमुक्त, राज्य सरकारचा निर्णय

या सामन्यात त्यांनी ब्रायन लाराला बाद करुन सामना अनिर्णित ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. ही घटना प्रेरणादायी आणि सकारात्मकतेचं हे एक उत्तम उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते.  अनिल कुंबळे यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले होते की, जखमी झाल्यानंतर कुंबळे गोलंदाजी करणार की नाही हे अस्पष्ट होते. दुखापतीमुळे गोलंदाजी केली नसती तरी त्यांना कोणी दोषी ठरवले नसते. पण त्यांनी या अवस्थेत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pariksha Pe Charcha Anil Kumble reacts after PM Modi uses broken jaw example to motivate students