पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेपाळ-झिम्बाब्वेला पुन्हा आयसीसीचे सदस्यत्व

पारस

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी)  नेपाळच्या राष्ट्रीय संघाला पुन्हा एकदा सदस्यत्व बहाल केले आहे. यापूर्वी एक दिवस अगोदर  पारस खडकाने संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याने नेपाळला मोठा धक्का बसला होता. पारसने ट्विटच्या माध्यमातून पद सोडत असल्याची माहिती दिली होती.  

विराट कोहलीनं व्यक्त केली किल्ले रायगडावर जाण्याची इच्छा

नेपाळ संघावरील बंदी हटवण्याचा आयसीसीचा निर्णय आनंददायी आहे. नव्या समितीला खूप खूप शुभेच्छा! नेपाळ क्रिकेट, खेळाडूंच्या सुधारणेवर त्यांनी भर द्यावा, असा उल्लेख पारसने आपल्या ट्विटमध्ये केला असून मी संघाचे कर्णधारपद सोडत आहे, असेही त्याने म्हटले आहे. नेपाळशिवाय आयसीसीने झिम्बाब्वे संघावरील बंदी देखील हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं! सेहवागचा शुभेच्छा स्ट्रोक

दोन्ही संघाच्या क्रिकेट मंडळामध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे जुलैमध्ये आयसीसीने नेपाळ आणि झिम्बाब्वे संघाचे सदस्यत्व रद्द केले होते.  पुन्हा सदस्यत्व बहाल करताना नेपाळ क्रिकेट मंडळाला काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. १७ सदस्यीय केंद्रीय कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर नेपाळचा मार्ग सुकर होण्यास मदत झाली.