पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक क्रिकेटर ब्लॅकमेल करत असल्याचा महिलेचा आरोप

शादाब खान

क्रिकेटच्या दुनियेत पाकिस्तानी खेळाडू आणि संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकल्याच्या अनेक घटना आहेत. हा सिलसिला थांबण्याचे काही नाव दिसत नाही. पाकिस्तानी क्रिकेटर मैदानातील आणि मैदानाबाहेरील कुरापतीमुळे अनेकदा विनाकारण वाद ओढावून घेताना दिसते. त्यात आता युवा क्रिकेटरच्या नावाची भर पडली आहे.

NZvsIND: नंबर वन बुमराहच्या नावे नकोसा विक्रम!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

YES I see all the messages you guys send and it is very hard for me to accept but here we are. This is personal/vulnerable for me to share but I have a platform Alhamdulillah to do right. 🙏🏼 I’m sorry to all the girls who reached out for help when they were used and taken advantage of by the person I was with. Astaghfirullah that I believed his lies and unconsciously enabled his behavior. I have zero to gain from posting this but if I can help one girl become aware then I’m willing to jeopardize myself. I’ve been dealing with this since I moved to Dubai. Shadab is probably the first guy I’ve cared about so deeply and it’s hard to process this still. I cant address anything further for legal reasons so please respect my privacy. 🙏🏼

A post shared by Ashreena Safia M. (@ashreenasafia) on

पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खान याच्यावर एका महिलेने चक्क ब्लॅकमेलिंगचा आरोप केलाय. दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या अशरीना साफिया या महिलेने पाकिस्तानी क्रिकेटरवर आरोप केला आहे. शादाब खान ब्लॅकमेल करत असल्याची एक पोस्टच तिने इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने शादाबसोबत माझा फोटो काढला होता. तो फोटो पत्रकाराकडून व्हायरल करण्यात आला. तेव्हापासून  शादाब मला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा अशरीना साफिया हिने केलाय.  

NZvsIND : ३१ वर्षांनंतर भारतावर व्हाईट वॉशची नामुष्की!

दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आपल्या नात्याविषयी कोणाला काही सांगू नको, असे शादाबने म्हटले होते. जर कोणाला काही बोललीस तर खासगी फोटो व्हायरल करेन अशी धमकी शादाबने दिली. कोणीही तुला माझ्याबद्दल काही विचारले तर तू फक्त माझी चाहती आहेस असेच सांगायचे, असे पाक क्रिकेटरने बाजावले आहे, असा आरोप साफियाने केला आहे. यावर पाक क्रिकेटरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistani cricketer Shadab Khan accused of blackmailing dubai girl shared screenshot by ashreena safia