पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी क्रिकेटर्सचे सोशल अकाउंट हॅक

फखर झमान

पाकिस्तान क्रिकेट फखर झमानचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने फखर झमानच्या पूर्वीच्या सर्व पोस्ट डिलीट करुन काही विचित्र पोस्ट शेअर केल्याच्या दिसत आहे. फखर झमानचा सहकारी शाहिन आफ्रिदीने ट्विटच्या माध्यमातून फखरचे इन्टा अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. फखर झमानने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

सचिनच्या पराक्रमाची पुनरावृत्ती, हनुमा दिग्गजांच्या यादीत

अधिकृत इन्टावर फखर झमानचे १ लाख ७१हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. एखाद्या सेलिब्रिटीच्या बाबतीत असा प्रकार समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा खेळ किंवा अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वाचे अकाउंट हॅक झाल्याचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव याचे इन्स्टा अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार घडला होता.   ​​​​​​

IND vs WI: बुमराहचा भेदक मारा, हॅटट्रिकसह टिपले ६ बळी 

फखर झमानने पाकिस्तानकडून  ३ कसोटी, ४४ एकदिवसीय आणि ३० टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावे १८२ धावा, एकदिवसीयमध्ये १ हजार २८ धावा तर टी-२० मध्ये त्याने ७४८ धावा केल्या आहेत. २०१७ मधील चॅम्पियन चषक स्पर्धेत फखर झमानने भारताविरुद्ध शतकी खेळी केली होती. या खेळीनंतर तो चांगलाच चर्चेत आला होता.