पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी क्रिकेटर मीटूच्या जाळ्यात; व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग लीक

इमाम उल हक

पाकिस्तानचा क्रिकेटर इमाम उल हक मी टू प्रकरणामध्ये अडकला आहे. त्याचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध असून त्याने या मुलींचे शोषण केले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर इमामचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग लीक झाले आहे. त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे इमाम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

सगळा विचार करूनच आम्ही नव्या नेत्यांना पक्षात घेतो - उद्धव ठाकरे 

एका ट्विटर युजरने सांगितले की, 'पाकिस्तानी क्रिकेटर इमाम उल हक ७ ते ८ मुलींना डेट करत आहे. तो या मुलींना फिरवत असून त्याचा फक्त वापर करत आहे. तो स्वत:ला एकटा असल्याचे सांगत आला आहे. अशाच एका मुलीसोबत असलेले काही स्क्रीनशॉट.' या ट्विटर युजरने इमानचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर टाकले आहेत. 

महिलेच्या पोटातून काढले दीड किलोचे दागिने, ६० नाणी

इमाम उल हक हा पाकिस्तानचा क्रिकेटर आहे. नुकताच झालेल्या वर्ल्ड कप २०१९ मध्ये तो पाकिस्तानच्या संघामध्ये होता. इमामने वर्ल्ड कप दरम्यान बांग्लादेशच्याविरोधात शतक पूर्ण केले होते. इमान उल हकने पाकिस्तानकडून १ सराव सामना आणि ३६ एकदिवशीय सामने खेळला आहे. त्याव्यतिरिक्त एक टी-२० सामना देखील तो खेळला आहे. 

पाटणावरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात चिमुकलीचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pakistani batsman imam ul haq lands in controversy after accused of having multiple affairs