पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PAKvsSL : पाक फलंदाजांमध्येच अनेकदा असा गोंधळ का दिसत असेल?

पाकिस्तानी फलंदाजांमध्ये पुन्हा गोंधळ

Pakistan vs Sri Lanka, T20 Series: श्रीलंकन संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यातील टी-२० मालिकेत पहिल्या सामन्यात श्रीलंकने पाकिस्तानला घरच्या मैदानात पराभूत करत एकदिवसीय सामन्यातील बदला घेण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. यापूर्वी दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका पाकिस्तानने २-० अशी खिशात घातली होती.

PAKvsSL T20 : युवा गोलंदाजाच्या विश्वविक्रमानंतही पाकच्या पदरी पराभव

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० सामन्यात श्रीलंकने ६४ धावांनी विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजामध्ये गोंधळा चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पाकिस्तान संघातील फलंदाजांमध्ये असा प्रकार पाहायला मिळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही मैदानात पाक फलंदाजांनी असा गोंधळ घातल्याचे आपण पाहिले असेल. त्यामुळे असा प्रकार पाकिस्तानी फलंदाजांच्याबाबतीच का घडतो? असा प्रश्नही एखाद्या क्रिकेट चाहत्याला पडू शकतो.  

ICC WTC Point Table : आफ्रिकेचा भोपळा, भारत टॉपला

सरफराज अहमद आणि इफ्तिखर अहमद मैदानात असताना हा मजेशीर किस्सा घडला. एक अप्रतिम यॉर्कर संयमीपद्धतीने खेळून काढल्यानंतर सरफराजने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी दुसऱ्या बाजूला असलेला इफ्तिहारने धाव घेण्यास नकार दिला. दोघेही नॉन स्ट्राइकच्या दिशेने धावताना दिसले. सरफराज अगोदर पोहचल्याने इफ्तिखरला बाद घोषित करण्यात आले. या धावबाद नंतर पाकिस्तानी संघाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pakistan vs sri lanka Twitter trolls Pakistan cricket team for involving in a hilarious run out see tweets