पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलम 'पनाह' ३४ वर्षांचा गडी १० वर्षानंतर पाकच्या राष्ट्रीय संघात

फवाद आलम

Pakistan vs Sri Lanka, Test Series: श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानी संघात डावखुरा फलंदाज फवाद आलमला संधी देण्यात आली आहे. ३४ वर्षीय फवाद आलम १० वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे. 

बाबो! ८ धावांत ऑल आऊट, १० खेळाडू शून्यावर बाद

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर फवादने तब्बल दहा वर्षानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेटच्या निवड समितीला प्रभावित केलं. 
यापूर्वी फवाद आलमने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या फवादला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आल्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चार शतके झळकावत त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवली. श्रीलंकेविरुद्ध तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.   

 

Video : आदर राखून कोहलीनं पुरा केला हिशोबाचा फेरा

फवादने पाकिस्तानसाठी ३ कसोटी सामने खेळले आहेत. एका शतकासह त्याने एकूण २५० धावा केल्या आहेत. २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो अखेरचा सामना खेळला होता. त्याच्यासह पाकिस्तानसाठी देखील हा कसोटी सामना महत्त्वपूर्ण आहे. याच कारण श्रीलंकेच्या संघावर २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये कसोटी सामन्याचे आयोजन होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pakistan vs sri lanka test series Fawad Alam returns to Pakistan Test squad for Sri Lanka series