पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PAKvsSL : दहा वर्षानंतर रंगणाऱ्या सामन्यावर पावसाने फेरले 'पाणी'

पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले. कराचीच्या मैदानात रंगणारा सामना नाणेफेक शिवायच रद्द करण्यात आला.

१० वर्षानंतर कराची येथील आंतरराष्ट्रीय मैदानात एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसाने दोन्ही संघासह त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड केला. मालिकेतील दुसरा सामना  २९ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.  
२००९ मध्ये लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती.

एका पुनियाने अव्वस्थान गाठले अन् दुसऱ्याने गमावले

या घटनेनंतर तब्बल दहा वर्षांनी श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या दौऱ्यातून श्रीलंकेच्या अनेक दिग्गजांनी माघार घेतली होती. विशेष म्हणजे श्रीलकंन खेळाडूंच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानकडून भारतावर आरोप करण्यात आले होते. भारताच्या दबावामुळेच श्रीलंकन खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याते पाकिस्तानच्या मंत्र्यांसह काही माजी क्रिकेटर्संनी म्हटले होते. 

...तर टी-२० चे नेतृत्व रोहितकडे द्यावे : युवराज सिंग