पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकची दहा वर्षांची प्रतिक्षा संपली, मायदेशात कसोटी मालिका ठरली

दहा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका रंगणार आहे.

दहा वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतर्गत पाकिस्तानी संघ श्रींलकेविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.  

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना हा ११ ते १५ डिसेंबर दरम्यान रावळपींडी येथी खळवण्यात येणार असून १९ ते २३ डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना कराचीच्या मैदानात रंगणार आहे.  श्रीलंकेचा संघ आक्टोबरमध्ये पाकिस्तानविरुद्द कसोटी मालिका नियोजित होती. मात्र वेळापत्रकात बदल करुन यावेळी तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत अनेक दिग्गज खेळाडूंनी सुरक्षिततेच्या कारणास्तव माघार घेतल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर श्रीलंकेचा संघ आता कसोटीसाठी पुन्हा एकदा पाक दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाला आहे. 

INDvsBAN : बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांतच आटोपला

२००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात काही श्रीलंकन खेळाडू जखमी देखील झाले होते. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद झाले होते. श्रीलंकेच्या संघानेच टी-२० सामन्यात खेळण्याची तयारी दाखवत पाकच्या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. दहा वर्षांनतर पाकिस्तानमध्ये  कसोटी मालिका रंगणार आहे. निमंत्रण स्विकारल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे आभारही मानले आहेत. या सामन्यासाठी दिग्गज खेळाडू काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरेल.