पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाबर बघतोय विराटची बरोबरी करण्याची स्वप्नं

विराट कोहली आणि बाबर आजम

पाकिस्तानची रन मशीन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बाबर आझमला विराट कोहलीसारखे व्हायचे आहे. मैदानातील विक्रमाच्या बाबतीत बाबर आझम विराटच्या जवळपासही नाही. पण तो विराट कोहलीची बरोबरी करण्याची स्वप्ने पाहत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबरने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

दिमाखदार विजयानंतर विंडीजच्या आनंदात ICC ने टाकला मिठाचा खडा

तो म्हणाला की, सध्याच्या घडीला कसोटी आणि एकदिवसीयमध्ये अव्वलस्थानी असलेल्या फलंदाजाशी बरोबरी करायची आहे. टी-२० क्रिकेटमध्ये बाबरने आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. विराट कोहली टी-२० वगळता अन्य दोन्ही क्रिकेट प्रकारात अव्वलस्थानी आहे. विराट कोहलीसोबत माझी तुलना होऊ शकत नाही. पण मी त्याची बरोबरी करण्याचा मानस बाळगून असल्याचे त्याने सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी विराजमान होण्यासाठी मला खूप धावा कराव्या लागतील. त्यासाठी मी कसोटीतील सातत्यपूर्ण खेळी करण्यावर भर देत असल्याचेही तो म्हणाला. 

सचिनला क्रिकेटमधला महत्त्वपूर्ण सल्ला देणारा हॉटेल वेटर अखेर सापडला

श्रीलंकाविरुद्ध रावळपिंडीच्या मैदानात शतकी कामगिरी करणारा बाबर म्हणाला, की विराट कोहली सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. त्याच्याप्रमाणेच मलाही कामगिरीत सातत्य राखायचे आहे. त्याच्यासारखे बनण्यासाठी मी माझी खेळी पुन्हा पुन्हा पाहून चुका सुधारण्यावर भर देत असल्याचे त्याने सांगितले.