पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या क्रिकेटरला पाकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

डेरेन सॅमी

पाकिस्तान सरकारकडून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डेरेन सॅमीला  सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा अच्छे दिन आणण्यात सॅमीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २३ मार्चला सॅमीला 'निशान-ए- हैदर' या पुरस्काराने गौरवण्यात येईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी याबाबतची घोषणा केली. सॅमी पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) पाचव्या हंगामामध्ये पेशावर जाल्मी या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

NZ vsIND 1st Test Day 2 : दोन दिवसांत एकाच बहाद्दराचं अर्धशतक!

पाकिस्तान सुपर लीगच्या सुरुवातीपासून डेरेन सॅमी या स्पर्धेत खेळत आहे. २०१७ मध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक परदेशी खेळाडूंनी  पीएसएल स्पर्धेतील लाहोरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. यावेळी सॅमीने खेळण्याची तयारी दाखवली होती. २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेपासून क्रिकेट जगतातील संघानी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. 

तिसऱ्यांदा हुकली पूनम यादवची हॅटट्रिक!

कॅरेबियन अष्टपैलू डेरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने दोनवेळा टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या नेतृत्वाखालील पेशावरनेही पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम गाजवला आहे. सॅंमीने पाकिस्तानचे मानद नागरिकत्व मिळण्यासंदर्भात अर्ज केला होता. पाक सरकारने त्याचा अर्ज स्वीकारला आहे. डेरेन सॅमी पाकिस्तामध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. एखाद्या देशाचे मानद नागरिकत्व मिळणारा सॅमी तिसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्ज यांना सेंट कीट्स सरकारने विश्व चषक २००७ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर मानद नागरिकता दिली होती.