Big Bash League: पाकिस्तानचा जलदगती गोलंदा हॅरिस रऊफ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीग (BBL) स्पर्धेत मेलबर्न स्टार्सचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहे. या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान हॅरिस आणि एका भारतीय क्रिकेट चाहत्याच्या व्हिडिओची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी गोलंदाजांने चक्क भारतीय क्रिकेट चाहत्याला गिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान स्टेडियमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भारतीयासोबत हॅरिसने दाखवलेली दिलदारी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. यासंदर्भातील व्हिडिओ बीबीएल ऑफिशियल टि्वटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
VIDEO: सेरेनाशी पंगा घेण्याचे माझ्यात धाडस नाही : माइक टायसन
दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या जागी मेलबर्न स्टारच्या संघात वर्णी लागलेल्या हॅरिसने दमदार कामगिरी करत ४ षटकात २७ धावा खर्च करुन ५ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी हरिकेन्स संघ १११ धावांत आटोपला. त्यांना ५२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या कामगिरीच्या जोरावर हॅरिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केलेला चेंडू हॅरिसने चक्क भारतीय सुरक्षा रक्षकाला गिफ्ट म्हणून दिल्याचे पाहायला मिळाले. हे गिफ्ट देत असताना हॅरिस आणि भारतीय क्रिकेट चाहता अन् सुरक्षा रक्षक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
रविंद्र जडेजासोबतच्या इंग्लिश-विंग्लिशवर हर्षा भोगलेंचे प्रतिक्रिया
सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना हॅरिस म्हणाला की, सामन्यानंतर मी स्टेडियमवर कार्यरत असलेल्या भारतीय सुरक्षा रक्षकाला चेंडू गिफ्ट म्हणून दिला. ज्यावेळी मी मैदानात आलो त्यावेळी मी पाकिस्तानचा खेळाडू असल्याचे सुरक्षा रक्षकाला सांगितले. त्यावेळी त्याने मला कडकडून मिठी मारली होती, असेही त्याने सांगितले. हॅरिस रऊफ याने आतापर्यंत राष्ट्रीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही. पाकिस्तान लीगमध्ये आपल्या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
Haris Rauf gave his 5fa wicket ball to a complete stranger who he met before the game 👏@BKTTires | #BBL09 pic.twitter.com/f2s1YMmIkI
— KFC Big Bash League (@BBL) December 22, 2019