पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारताच्या दबावामुळेच श्रीलंकन खेळाडू पाकमध्ये खेळण्यास तयार नाहीत'

श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

श्रीलंका क्रिकेट संघातील १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याला जाण्यास नकार दिला. सुरक्षिततेच्या कारणास्तव श्रीलंकन खेळाडूंनी दौऱ्यातून माघार घेतली असताना पाकिस्तान मंत्र्यांने हा मुद्दा पुन्हा एकदा भारताशी जोडला आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी भारतानेच श्रीलंकन खेळाडूंवर दबाव टाकल्याचे विधान केले आहे.

भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावल्यामुळेच त्यांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. श्रीलंका खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर गेले तर आयपीएलमधील त्यांचा करार संपुष्टात येईल, अशी धमकी भारताने दिली आहे, असा दावा पाकिस्तानी मंत्र्यांनी केला आहे.  

चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, एका क्रीडा समालोचकाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकन खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यात सहभाग घेतला तर त्यांचा आयपीएल करार रद्द करण्यात येईल, अशी धमकी भारताकडून देण्यात आली आहे. हे अगदीच खालच्या स्तरावरील आणि निंदणीय कृत्य आहे. 

श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी दिला पाकला दणका! दौऱ्यातून घेतली माघार

२७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघादरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यासाठी संघात सहभागी होण्यास नकार कळवला आहे.