पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PAKvsSL T20 : युवा गोलंदाजाच्या विश्वविक्रमानंतही पाकच्या पदरी पराभव

युवा गोलंदाजाचा विश्वविक्रम

आपल्या कारकिर्दितील दुसरा टी-२० सामना खेळणाऱ्या पाकच्या जलदगती गोलंदाजांनी विश्व विक्रमी कामगिरीची नोंद केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात  १९  वर्षीय मोहम्मद हसनैन याने सर्वात कमी वयात हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी टी-२० सामन्यात  सर्वात कमी वयात हॅटट्रिक करण्याचा विक्रम हा अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या नावे होता. त्याने २० व्या वर्षी अशी कामगिरी केली होती. 

INDvsSA: भारताच्या सलामीच्या 'विराट' विजयामागची पाच

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्यातील ४ षटकात ३७ धावा खर्च करुन त्याने तीन विकेट्स घेतल्या. यात भनुका (३२), दुसून शनाका (१७) आणि शहान जयसूर्या (२) या श्रीलंकन फलंदाजांचा समावेश आहे. 

शेवटचा दिवस ढकलायला आफ्रिकेला जमलं नाही, भारताचा दिमाखदार विजय

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकच्या युवा गोलंदाजाने विश्वविक्रमी कामगिरी केल्यानंतरही पाकला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने निर्धारित २० षटकात ५ बाद १६५ धावा करत पाकिस्तानसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकचा संघ १७.४ षटकात १०१ धावांत आटोपला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistan fast bowler Mohammad Hasnain creates world record with hat trick against Sri Lanka in lahore