पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीसोबत अडकला विवाहबंधनात

हसन अली

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली  भारतीय तरुणीशी विवाहबंधनात अडकला आहे. मंगळवारी दुबईत हसन आणि शामिया आरझू यांचा विवाहसोहळा पार पडला. शामिया ही मुळची हरियाणाची रहिवाशी आहे. 

श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी रद्द करून ७ वर्षे केली

शामिया आणि हसनचे विवाहसोहळ्यातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुबईतच  शामिया आणि हसनची  भेट झाली होती. शामियाचा प्रामाणिक स्वभाव हसनला आवडला. हसननं तिच्या स्वभावापासून प्रभावित होत तिला लग्नाची मागणी घातली.

हसननं अनेक भारतीय खेळाडूंनां देखील लग्नाचं आमंत्रण पाठवलं होतं. जर भारतीय खेळाडूंनी लग्नाला उपस्थिती लावली असती तर मला नक्कीच आनंद झाला असता असंही हसन म्हणाला. दुबईत अत्यंत थाटामाटात हा सोहळा पार पडला.

आलिया भटच्या बेस्टफ्रेंडशी प्रेमसंबंधांच्या चर्चेनंतर राहुल म्हणतो...

भारतीय महिलेशी लग्न करणारा हसन हा पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी जहीर अब्बास, मोहसिन खान आणि शोएब मलिक यांनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे.