पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोएब मलिकनंतर हा क्रिकेटर होणार भारताचा जावाई

हसन अली

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे हसन अलीचा विवाह हा भारतीय मूळ वंशाच्या शामिया आरजू हिच्यासोबत होणार आहे. ही जोडी २० ऑगस्टला विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. शामिया हरियाणाची असून सध्या ती एमिरेट्स एअरलाइन्समध्ये  फ्लाइट इंजीनिअर म्हणून कार्यरत आहे.  पाकिस्तानी वृत्तानुसार या जोडीचा विवाह समारंभ दुबईमध्ये संपन्न होणार आहे. 

हसनपूर्वी  शोएब मलिक, झहीर अब्बास आणि मोहसिन खान या पाकिस्तानी क्रिकेटर्संनी भारतीय तरुणींशी विवाह थाटल्याचे पाहायला मिळाले आहे. शोएब मलिकने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत विवाह केला आहे. झहीर अब्बास यांनी रीता लूथरा आणि मोहसिन खानने बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉयसोबत विवाह केला होता.  

..म्हणून विराट विश्रांती विना विंडीज दौऱ्यासाठी सज्ज

हसन अलीला विश्वचषक स्पर्धेतील चार सामन्यात संधी मिळाली होती. पण त्याला संधीचं सोनं करण्यात अपयश आले होते. चार सामन्यात त्याला केवळ दोन बळी मिळवता आले. २०१६ मध्ये हसन अलीने पाकिस्तानकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २०१७ मध्ये चॅम्पियन चषक स्पर्धेत हसन अलीने लक्षवेधी कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने उद्योत्मुख खेळाडूचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.