पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डेव्हिस चषक : भारताच्या भूमिकेनंतर फायनल निर्णय

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात २९ ते ३० नोव्हंबर रोजी नियोजित सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. भारताविरुद्धचा सामना त्रयस्त ठिकाणी खेळवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर एटीपीने भारताकडे विचारणा केली आहे. 

INDvsBAN : पहिल्या कसोटीपासूनच टिम इंडिया मांडणार नवा 'डाव'

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) सुरक्षिततेच्या कारणास्तव इस्लामाबाद नियोजित सामना त्रयस्त ठिकाणी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाकिस्तानने आव्हान दिले आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्यावतीने अखिल भारतीय टेनिस महासंघाला  (एआयटीए) विचारणा केली आहे. याप्रकरणी आयटीएफ १८ नोव्हेंबरला अंतिम निर्णय घेणार आहे. 

नेट प्रॅक्टिसपूर्वी कोहलीची गल्लीत फटकेबाजी

अखिल भारतीय टेनिस महासंघाचे सचिव हिरण्यमय चटर्जींनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीएफने पाकिस्तानच्या आव्हानानंतर आम्हाला विचारणा केली आहे. आमची भूमिका अद्यापही तिच आहे. सुरक्षितेबाबत आमच्यात चिंतेचे वातावरण आहे.  यासंदर्भात आम्ही आयटीएफला आम्ही सूचना देणार आहोत. त्यानंतर आम्ही अंतिम निर्णयाची प्रतिक्षा करु असे त्यांनी म्हटले आहे. कर्तारपूर कॉरिडोअर शांतीपूर्वक खुले झाल्यामुळे दोन्ही देशांतील तणावाच्या परिस्थितीत देखील सामन्यात कोणताही व्यत्यय येणार नाही, अशी आशा पाकिस्तान टेनिस महामंडळाने व्यक्त केला आहे.