पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम

अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन संघाने टी-20 सामन्यात सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात  पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. 2016 नंतर पाक संघात स्थान मिळालेला अकमल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिकवेळा पहिल्या चेंडूवर बाद होणारा तो फलंदाज ठरला.  

सानियाची बहिण अनाम आणि असद अझरुद्दीन लवकरच विवाहबंधनात

आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पहिल्या चेंडूवर बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये तिलकरत्ने दिलशान, शाहिद आफ्रिदी आणि बांगलादेशच्या मोर्तुझा यांचाही समावेश आहे. मात्र दिलशान आणि अकमल ही दोघे तब्बल दहावेळा पहिल्या चेंडूवर बाद झाले आहेत.

अजिंक्य रहाणेच्या गोंडस चिमुकलीला पाहिले का?

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सोमवारी रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलकेंचे सुरुवात खराब झाली. मात्र मध्यफळीतील भानुकाने 48 चेंडूत 4 चौकार आणि 77 धावांची खेळी करत लंकेने 182 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19 षटकात 147 धावांवर आटोपला. श्रीलंकेने पाकिस्तानामध्ये पहिल्यांदा एखादी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.