पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचा खेळ कधी सुधारणार? पत्नी सायनाच्या पराभवानंतर कश्यपचे ट्विट

सायना नेहवाल

BWF World ChampionShip 2019 स्पर्धेतून भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा प्रवास संपुष्टात आला. सायनाच्या या स्पर्धेतील पराभवानंतर बॅडमिंटनपूट आणि तिचा पती पी.कश्यपने सामन्यादरम्यान पंचाच्या निर्णयावर शंका व्यक्त करणारे ट्विट केले आहे. खुद्द सायना नेहवालनेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

सायनाच्या पराभवानंतर केलेल्या ट्विटमध्ये कश्यपनं लिहलंय की, पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सायनाने २ गुण गमावले. याशिवाय अनेक चुकीचे निर्णय सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. जागतिक बॅडमिंटनसारख्या स्पर्धेत रिव्ह्यू सिस्टम नसल्याची खंतही कश्यपने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली. सायना नेहवालने देखील ट्विटच्या माध्यमातून पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. ते दोन पाइंट्स पंचांनी का नाकारले हे मला अद्यापही समजू शकलेले नाही. दुसऱ्या सेटमध्ये पंचांनी मला रेषेजवळ असलेल्या पंचांना त्यांचे काम करु देत, असे सुनावल्याचा उल्लेखही सायनाने ट्विटमध्ये केला आहे.

 ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालला उपांत्य पूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टकडून पराभवाचा सामना करावा लागला. ब्लिचफेल्टने १ तास १२ मिनिटे चाललेल्या सामन्यात सायनाला १५-२१, २७-२५,२१-१२ अशा फरकाने पराभूत केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:P Kashyap and saina nehwal slams umpiring at Badminton World Championship after Nehwal s defeat