पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरेश रैनावरील शस्त्रक्रियेनंतर जाँटी ऱ्होड्सचे हृदयस्पर्शी टि्वट

जाँटी ऱ्होड्स

टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज सुरैश रैनावर एम्सटरडॅमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे तो या महिना अखेर भारतात सुरु होणाऱ्या देशांतर्गत सामने खेळू शकणार नाही. रैनावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सने एक हृदयस्पर्शी टि्वट केले आहे. 

३२ वर्षीय रैनाला गेल्या हंगामापासून गुडघ्याचा त्रास जाणवत होता. शस्त्रक्रियेतून सावरायला त्याला आणखी किमान ६ आठवडे लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने टि्वट करत रैनाच्या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. बीसीसीआयने आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, सुरेश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काही महिन्यांपासून तो गुडघेदुखीने त्रस्त होता. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला किमान ४ ते ६ आठवडे लागू शकतात. 

बीसीसीआयच्या या टि्वटवर ऱ्होड्सने रैनाला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने टि्वटमध्ये म्हटले की, सुरेश रैना तू आपल्या कामाच्या निष्ठेमुळे अनेक लोकांचा प्रेरणास्त्रोत आहेस. विशेषतः गेल्या काही वर्षांपासून. पण माझ्या मित्रा..आता आपल्या शरीराचे ऐक. मी तुला जेवढं ओळखतो, त्यावर हे म्हणू शकतो की, तुला उद्यापासूनच प्रशिक्षणाला उतरण्याची घाई झाली असेल. थोडं सबुरीने घे.

ख्रिस गेलला मैदानावरच डान्स शिकवतानाचा विराटचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, रैनाने अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना इंग्लंडविरोधात लीड्स येथे खेळला होता. रैनाने आतापर्यंत टीम इंडियाकडून १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावे एकदिवसीय सामन्यात ३६ विकेट्सही आहेत. तो २०११ च्या आयसीसी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.

फिट है बॉस'!, विराटने शेअर केला २०१६ आणि २०१९ चा व्हिडिओ