टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सुधारित नागरिकत्व कायद्यावर (सीएए) वक्तव करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. या संवेदनशील मुद्द्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी यावर काहीच भाष्य करणार नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरोधा ५ जानेवारीपासून ३ सामन्यांची टी-२० मालिकेची सुरुवात गुवाहाटी येथून करणार आहे. सीएएला गुवाहाटीमध्ये मोठा विरोध होत आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
विराटने पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले की, याप्रकरणी मी बेजबाबदारपणे कोणतेही भाष्य करु इच्छित नाही. मला संपूर्ण माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्याचा अर्थ काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर जबाबदारीने मी माझे विचार मांडेन.
#WATCH Indian captain Virat Kohli on #CitizenshipAmendmentAct: I don't want to be irresponsible&speak on something that has radical opinions on both sides. I need to have total information&knowledge of what it means&what is going on, then be responsible to give my opinion on it. pic.twitter.com/Bli07MyLtq
— ANI (@ANI) January 4, 2020
दरम्यान, तीन शेजारी देशातून (अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान) धार्मिक छळामुळे भारतात शरण घेणाऱ्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध आणि जैन समाजाच्या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी सीएए २०१९ तयार करण्यात आले आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका : स्टेडियममध्ये बॅनर, पोस्टर नेण्यास प्रतिबंध
उल्लेखनीय म्हणजे २०१६ मध्ये विराट कोहलीने नोटबंदीचा निर्णय भारतीय राजकारणातील सर्वांत मोठे पाऊल असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनेक लोकांनी त्याच्या या वक्तव्यावर टीका केली होती. सीएएवरुन विराटने संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय यावर काहीच भाष्य करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
जेव्हा तुम्ही काही बोलता, तेव्हा दुसरा कोणीतरी त्यावर वेगळे मत व्यक्त करतो. ज्या विषयाची मला काहीच माहिती नाही, अशा मुद्द्यावर मी भाष्य करुन फसणार नाही, असेही विराटने म्हटले.