पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाला दुसरा धक्का! इशांतही न्यूझीलंड दौऱ्यातून आउट

इशांत शर्माची न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला लागोपाठ दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवननंतर इशांत शर्मालाही या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. रणजी स्पर्धेतील विदर्भविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना इशांतला दुखापत झाली होती. सुरुवातीला दुखापत किरकोळ असल्याचे बोलले जात होते. मात्र एक्स रेनंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान सहा आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. 

Under-19 World Cup : स्पर्धेत निच्चांकी धावसंख्येसह लाजिरवाणा विक्रम

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक संजय भारद्वाज यांनी इशांत शर्मा न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इशांतला दुखापतीतून सावरण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा अवधी लागणार आहे. परिणामी न्यूझीलंड दौऱ्यातील दोन कसोटी मालिकेसाठी तो भारतीय संघाचा भाग नसेल. सोमवारी इशांतची दुखापतीची तपासणीदरम्यान एमआरआय स्कॅन करण्यात आले होते. त्याचे रिपोर्टस सकारात्मक असतील असे वाटले होते. मात्र हे रिपोर्ट्स  इशांतच्या न्यूझीलंड दौऱ्याला ब्रेक लावणारे निघाले. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना खेळणार असून दौऱ्यातील अखेरचा कसोटी सामना हा २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान रंगणार आहे. इशांतच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

गंभीर स्ट्रोक : हा बॅकअप मॅन पंतचं पॅकअप करु शकतो

विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकात इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार फैज फजल याने टोलवलेला चेंडू अडवण्याच्या नादात त्याचा तोल गेल्याने तो जमीनीवर पडला. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी इशांत शर्माची भारतीय संघात वर्णी लागणार हे जवळपास पक्के होते. भारतीय कसोटी संघातील तो एक प्रमुख गोलंदाज आहे. पण न्यूझीलंड दौऱ्यात तो टीम सोबत नसल्यामुळे संघाच्या अडचणी वाढू शकतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: nz vs ind team india faces another jolt as ishant sharma is too ruled of the new zealand tour