भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकत भारताने टी-२० मालिका खिशात घातली. भारतीय संघाच्या न्यूझीलंडमधील पहिल्या-वहिल्या टी-२० मालिकेच्या ऐतिहासिक विजयाच्या चर्चेसोबत विराट कोहलीच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
Australian Open : फेडररला शह देत जोकोविचनं गाठली फायनल
विराट कोहलीचा जो फोटो व्हायरल होत आहे त्या फोटो फ्रेममध्ये दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटर लॉरा वॉलवार्टही दिसत आहे. लॉराने विराटसोबतचा हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते. लॉरा आणि विराट यांची हॅमिल्टनमध्ये भेट झाली. यावेळी विराटने तिच्या फलंदाजीचे कौतुकही केले. विराटसोबतच्या फोटोमुळे लॉराही चांगलीच चर्चेत आली आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोवर व्यक्त होताना दिसत आहे.
'एकता कपूर यांना पद्मश्री मिळतो मग दिवंगत वडिलांना हा सन्मान का नाही?'
कोण आहे विराटसोबत फोटो झळकलेली ती
लॉरा ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील एक खेळाडू आहे. तिने ५० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. दक्षिण अफ्रीकेचा महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडमध्येच आहे. गुरुवारी हॅमिल्टनमध्ये न्यूजीलंड महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी या सामन्यात ६ विकेट्सनी विजय मिळवला. लॉराने या सामन्यात २६ धावांची खेळी केली होती. लॉराने एकदिवसीयमध्ये ६३.९२ च्या स्ट्राइक रेट आणि ४५.६३ च्या सरासरीने १ हजार ८७१ धावा केल्या असून टी-२० मध्ये ९५.०५ च्या स्ट्राइक रेटसह १७.९३ च्या सरासरीनं २६९ धावा केल्या आहेत. एकदिवसीयमध्ये तिच्या नावे २ शतकासह १६ अर्धशतकांची नोंद आहे.