पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रवींद्र जडेजाने मांजरेकरला केले ट्रोल, मिळाले हे उत्तर

रवींद्र जडेजा

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना ट्रोल केले आहे. जडेजा आपली मते बिनधास्तपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने एकदा संजय मांजरेकर यांच्या एक कमेंटवरुन ट्विटरवर चोख शब्दांत उत्तर दिले होते. त्यानंतर दोघांमध्ये सर्व काही सुरळित सुरु झाले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर जडेजाने पुन्हा एकदा टि्वटरच्या माध्यमातून संजय मांजरेकर यांना ट्रोल केले. मांजरेकर यांनीही त्याला तितकेच मजेदार उत्तरही दिले. 

IPL च्या वेळेत मोठा बदल होण्याची शक्यता, आज होणार निर्णय

भारताने न्यूझीलंडविरोधात दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेटने विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली. नाबाद ५७ धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर मांजरेकर यांनी एक टि्वट केले. त्यांनी म्हटले की, 'सामनावीराचा पुरस्कार एखाद्या गोलंदाजाला द्यायला हवा होता.' 

यावर जडेजाने निशाणा साधत म्हटले की, 'त्या गोलंदाजाचे नाव काय आहे?, कृपया ते नावही सांगा.' यावर मांजरेकर यांनीही शानदार उत्तर दिले. 

ते म्हणाले, 'हाहाहा...तू किंवा जसप्रीत बुमराह. बुमराह यासाठी की त्याने तिसऱ्या, दहाव्या, १८ व्या आणि २० व्या षटकांत खूप कमी धावा दिल्या होत्या.'

कोचिंग म्हणजे ब्रेडवर बटर लावण्यासारखं नाहीः रवी शास्त्री

बुमराहने चार षटकांत २१ धावा देऊन १ विकेट घेतली होती. तर जडेजाने चार षटकांत १८ धावा देऊन २ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने रॉस टेलरला बाद केले होते. तर जडेजाने कर्णधार केन विलियम्सन आणि कॉलिन डि ग्रँडहोमची विकेट घेतली होती. 

२०१९ मध्ये विश्वचषकात जडेजाला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने अखेरचा सामना श्रीलंकेविरोधात खेळला होता. सेमीफायनलच्या आधी मांजरेकर यांनी जडेजावर भाष्य करत तो 'कामचलाऊ' क्रिकेटपटू असल्याचे म्हटले होते. जडेजाने सेमीफायनलमध्ये १० षटकांत ३६ धावा करत १ विकेट घेतली होती. फलंदाजीतही कमाल दाखवत ७७ धावांची खेळी केली होती. सोशल मीडियावर जडेजाने मांजरेकर यांना असे प्रत्युत्तर दिले होते की, मांजरेकर यांना नंतर माफीही मागावी लागली होती.

सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट आणि मुलीचा अपघाती मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NZ vs IND T20 Series India vs New Zealand Ravindra Jadeja takes a dig at Sanjay Manjrekar after 2n t20 international match between new zealand and india