पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : भन्नाट झेलनंतर जडेजाची 'कॅची फिलिंग'

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जडेजाने अप्रितम झेल घेतल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्राइस्टचर्चच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटीत न्यूझीलंडने पुन्हा एकदा भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपून अवघ्या ७ धावांच्या आघाडीसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे सहा गडी तंबूत परतले. भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोपूर्वी रविंद्र जडेजाने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद दिला. 

NZvsIND 2nd Test: दबावात चुका करणाऱ्या विराटला पाहून बोल्ट

दुसऱ्या दिवसातील न्यूझीलंडच्या पहिल्या डावात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने वॅगनरचा भन्नाट झेल घेतल्याचे पाहायला मिळाले. जेडेजाने हवेत उडी मारुन एका हाताने पकडलेला झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

INDvsNZ: फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, दुसऱ्या डावातही निम्मा संघ तंबूत

न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर ब्रेकमध्ये जडेजाने या अप्रतिम झेलवेळी मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या. वॅगेनर माझ्या दिशेने चेंडू फटकावणार याची कल्पना आली होती. मात्र चेंडू अपेक्षेपेक्षा खूप वेगाने आला. हा झेल घेण्यासाठी मी हात पुढे केला आणि अखेर झेल हातात बसला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या आघाडीला सुरुंग लावल्यानंतर नील वॅगेनर आणि कायले जेमीसन यांनी नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. नील वॅगेनर बाद झाल्यानंतर जेमीसन ४९ धावांवर बाद झाला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nz vs ind ravindra jadeja speaks on stunning catch of neil wagner in christchurch watch viral video