पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून क्रिकेट चाहते विराटवर भडकले

विराट कोहली

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांची मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना चौथ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीने चौथ्या टी-२० सामन्यात घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना रुचलेला नाही. ट्विटरच्या माध्यमातून नेटकरी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. 

रोहित जैसा 'विसराळू' कोई नहीं!

उप-कर्णधार रोहित शर्मा, रविद्र जडेजा आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत संघात वर्णी लागलेल्या संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वाशिंग्टन सुंदर यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माला संघात स्थान न मिळाल्यामुळे चाहते विराट कोहलीवर चांगलेच भडकले. एका नेटकऱ्याने कोहली स्वत: विश्रांती का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत कोहलीवर निशाणा साधलाय. रोहित नसेल तर सामना पाहण्यात मजा नाही, अशा प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटल्याचे पाहायला मिळाले. 

अभिमानास्पद! राणी ठरली 'अ‍ॅथलेट ऑफ द इयर २०१९' पुरस्काराची मानकरी

न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यातील टी-२० मालिकेत सलग तीन विजयासह टीम इंडियाने ऐतिहासिक मालिका यापूर्वीच आपल्या नावे केली होती. भारतीय संघ न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. पण रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला चौथा सामना जिंकणे जमले नाही. चौथ्या सामन्यात भारताने प्रथम फंलदाजी करताना न्यूझीलंडसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवले. मनिष पांडेचे नाबाद अर्धशतक आणि लोकेश राहुलच्या ३९ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nz vs ind 4th t20 international match india vs new zealand live cricket scorecard ind vs nz at sky stadium wellington rohit shamra rested for this match fans not happy with captain virat kohli