पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZ v IND 3rd T20I: कोहलीने धोनीला टाकलं मागे, नोंदवला खास विक्रम

विराट कोहली

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावे केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून कर्णधाराच्या रुपात विराट कोहलीने सर्वांधिक धावा आपल्या नावे केल्या आहेत. या प्रकारात विराटने धोनीला मागे टाकले आहे. सर्व प्रकारात विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या प्रकारात आता त्याच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसी आणि न्यूझीलंडचा केन विल्यिमसन आहे. विराटने हेमिल्टनच्या सेडन पार्कवर तिसऱ्या टी-२० सामन्यात २७ चेंडूवर ३८ धावांची खेळी केली. 

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर सौरव गांगुलीने केले भाष्य

विराटच्या खात्यात कर्णधार म्हणून आता ११२६ धावा झाल्या आहेत. डुप्लेसीने कर्णधार म्हणून १२७३ टी-२० धावा केल्या आहे. तर विल्यिमसनने कर्णधार म्हणून ११४८ धावा केल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या खात्यात १११२ धावा आहेत. विराटने न्यूझीलंडविरोधात २५ धावा करताच त्याने धोनीला मागे टाकले. विराटने कर्णधार म्हणून आपला ३६ वा सामना खेळला. यादरम्यान त्याने ३७.०६ च्या सरासरी आणि १२२.६० स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने आठवेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nz vs ind 3rd t20i at Seddon Park Hamilton india vs new zealand ind vs nz virat kohli most runs by an indian captain in t20 international