न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सूपर ओव्हरमध्ये मात देत भारताने ही मालिका आपल्या खिशात घातली. मालिकेत ३-० ने भारताने निर्णायक आघाडी घेतली. हॅमिल्टनमध्ये बुधवारी झालेला सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झाला. या सामन्यात सूपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर रोहित शर्माने मारलेल्या दोन षटकारांच्या जोरावर भारताने विजय संपादन केला. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात ट्वेंटी-२० मालिकेत भारताने यश संपादन केले आहे.
इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड
भारताच्या विजयाबरोबरच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूप बघितला जातो आहे. या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडच्या टीमचा एक चाहता 'भारत माता की जय'ची घोषणा देताना दिसतो. क्रिकेट हा शेवटी एक खेळ आहे आणि कोणताही खेळ खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहिजे, यावर या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे ठरणारे पाच मुद्दे
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. १६ सेकंदाचाच हा व्हिडिओ आहे. KY नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
During #INDvNZ 2nd T20I, a certain New Zealander became an Indian supporter for a while when he chanted 'Bharat Mata Ki Jai' and a motivating slogan for the ‘Men in Blue’. 😍😍😍pic.twitter.com/Z3MbL1CJMD
— KY (@KyYadhu) January 29, 2020