भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना बुधवारी हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला जाणार आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनमध्ये बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडू शकते. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला मालिका विजय मिळवायचा आहे. तर न्यूझीलंडला विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करायचे आहे.
वर्कआऊटदरम्यान विराट कोहलीने केला स्टंट, पाहा VIDEO
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे हॅमिल्टनमध्येही पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, पाऊस अडथळा आणू शकतो. हवामान विभागानुसार, बुधवारी पावसाची शक्यता आहे. दिवसा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, सामना सायंकाळी होणार आहे. सामना होईल की नाही हे पूर्णपणे मैदानावर पाण्याचा निचरा करण्याची सोय कशी आहे यावर अवलंबून आहे. पाऊस पडल्यास किती वेळात ग्राऊंड्समन मैदान तयार करतील हे पाहण्यायोग्य राहिल. ओलसर मैदान दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब ठरु शकते.
शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय
या मैदानावर आतापर्यंत एकूण ९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर सरासरी १७७ धावा बनवल्या आहेत. तीनवेळा या मैदानावर २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या गेल्या आहेत. या मैदानावर पाचवेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि चारवेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय नोंदवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा न्यूझीलंडने केल्या आहेत. त्यांनी ४ विकेटच्या बदल्यात २१२ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल टीम इंडियाने २०८ धावा केल्या होत्या.