पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जोकोव्हिचनं विम्बल्डनमध्ये फेडररला नमवत पटकावलं १६ वे ग्रँडस्लॅम

जोकोव्हिच फेडररवर भारी पडला

सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी झालेल्या विम्बल्डनच्या फायनलमध्ये अनुभवी रॉजर फेडररला नमवत विम्बल्डन पुन्हा एकदा नाव कोरले. ४ तास ५७ मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोव्हिचने फेडररला  ७-६, १-६, ७-६, ४-६ आणि १३-१२ अशा फरकाने मात दिली.  

सेंटर कोर्टवर रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. पहिल्या सेटपासून दोघांमध्ये प्रत्येक एका पॉइंटसाठी संघर्ष पाहायला मिळाला. सर्बियाच्या जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये ७-६ अशी बाजी मारत सुरुवातीला आघाडी घेतली. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या फेडररने जोरदार कमबॅक करत दुसरा सेट ६-१ असा सहज आपल्या नावे केला.  

या दोघांच्यामध्ये तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा संघर्षमय लढतीची अनुभूती आली. या सेटमध्ये जोकोव्हिचने फेडररला  ७-६ ने नमवले. त्यानंतर रॉजर फेडररने चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचची सर्विस ब्रेक करत ६-४ अशा फरकाने सेट आपल्या नावे केला.  

Wimbledon 2019: सेरेना विलियम्सनला पराभूत करुन सिमोना चॅम्पियन

पाचव्या सेटमधील दोघांच्यातील संघर्ष पुन्हा तापल्याचे पाहायला मिळाले. फेडरर सुरुवातीला २-४ ने पिछाडीवर होता. मात्र जोकोव्हिचची सर्विस ब्रेक करत त्याने ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा जोकोव्हिचने सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी केली. रोमहर्षक परिस्थितीत गेलेल्या या सेटमध्ये स्कोर ७-७ असा झाला. हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार असे वाटत असताना पुन्हा स्कोर ९-९ असा झाल्याचे पाहायला मिळाले. टाय ब्रेकमध्ये जोकोव्हिचने फेडररच्या २१ व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न मोडित काढत विम्बल्डनचा किताबावर आपले नाव कोरले.