पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जोकोव्हिच अन् त्याच्या पत्नीमध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा!

नोव्हाक जोकोव्हिच

टेनिस कोर्टवर बहरदार कामगिरीनं ओळखल्या जाणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचच्या आयुष्याचं गणित बिघडण्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पत्नी जेलेना रिस्टिकपासून तो वेगळा होणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत जोकोव्हिचनं रोमहर्षक सामन्यात फेडररला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. या सामन्यावेळी त्याची पत्नी जेलेना लंडनमध्ये असूनही सामना पाहायला आली नसल्यामुळे ही जोडी विभक्त होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दोघांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगत असताना नोव्हाक जेकोव्हिचने सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. लहान मुलगी असल्या कारणाने जेलेनाने गर्दीच्या ठिकाणी येणे टाळले, असे तो म्हणाला. पण हे कारण योग्य असते तर मागील वर्षी देखील ती जोकोव्हिचचा खेळ पाहायला आली नसती. 

जोकोव्हिच फायनलसाठी मैदानात उतरण्यापूर्वी जेलेनाने सोशल मीडियावर मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. याशिवाय जूनमध्ये फेंच ओपन स्पर्धेत जेलेना चार वर्षांच्या मुलासोबत जोकोव्हिचचा सामना पाहण्यासाठी आली होती.  
दोनवर्षांपूर्वी देखील या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येणार असल्याचे वृत्त समोर आले होते. जोकोव्हिचच्या खराब कामगिरीला जेलेना जबाबदार असल्याचा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले होते. बरेच दिवस एकत्र राहिल्यानंतर २०१४ मध्ये ही जोडी विवाह बंधनात अडकली होती.